Author Topic: कविता मला हि सुचायला लागल्या..  (Read 530 times)

कविता मला हि सुचायला लागल्या
विरहाच्या लाटेत माझ्या नाव बुडायला लागल्या
नावेत ह्या माझ्या तुझ्या प्रेमाचेच क्षण
घेउनी ह्या साऱ्या नाव चालल्या

कविता आज मला ही सुचायला लागल्या

दूर मला तू कराया लागलीस
तेव्हा
शब्द हि मला सुचायला लागले

प्रश्नांचे हि उत्तर मिळाले नाही
पाहून मग हे शब्द भिजाया लागला

कविता मला हि सुचायला लागल्या ..

असे का आज करते आहेस तू
एकट्यात रडते आहेस तू

डोळ्यातील तुझे हे अश्रू पाहू मी कसे
हृदयात माझ्या उमटावी ठसे

नको ग एवढे हि दूर मज करू
स्वप्ना मधूनही तू जाऊ लागलीस

कविता मला हि सुचायला लागल्या ..

अधुरे आहे हे जीवन माझे
तूच सूर आणि तूच लय माझे

येशील केव्हा तरी जीवनात माझ्या
मन माझे मजला बोलायला लागले

कविता मला हि सुचायला लागल्या ..
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆
« Last Edit: April 26, 2012, 03:25:28 PM by प्रशांत दादाराव शिंदे »