Author Topic: कधी वाटतं  (Read 874 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
कधी वाटतं
« on: April 27, 2012, 11:09:29 AM »

कधी वाटतं आयुष्य हे एक समीकरण असावं...
कारण अधिक-उणे,कमी-जास्त हे हिशेब इथे चालतात !

कधी वाटतं आयुष्य हे एक गाणं असावं...
कारण इथेही वादी, संवादी, विवादी,वर्ज्य वगैरे 'राग' लोभ असतात !

कधी वाटतं आयुष्य हे एक पुस्तक असावं...
कारण इथे पानांप्रमाणे माणसेही उलटतात , उलगडतात !

कधी वाटतं आयुष्य हे एक व्यंजन असावं...
कारण इथं सर्वकाही प्रमाणातच असावं लागतं
मीठ चिमुटभर, साखर दोन चमचे,
वेलदोडा चवीनुसार, केशर आवश्यकतेनुसार !

कधी वाटतं आयुष्य हे वस्त्रासारखं असावं...
कारण इथेही असते नात्यांची गुंतागुंत, घट्ट वीण
अन प्रसंगी उसवणूकसुद्धा !

--- वैभव वसंत जोशी, अकोला

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: कधी वाटतं
« Reply #1 on: April 30, 2012, 02:00:29 PM »
wow.... khup chan