Author Topic: कविता म्हणजे नक्की काय?  (Read 744 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
कविता म्हणजे नक्की काय?

कविता म्हणजे अंतर्मनाच्या दुधावरची कोवळी साय

कविता म्हणजे पावसाळ्यातल्या गारव्यातील गरमागरम चाय

कविता म्हणजे जमीन,पाणी,वायू , अग्नी अन वरचं आभाय !

कविता म्हणजे नक्की काय?

कविता म्हणजे शैशवातील घरातला काढता पाय

कविता म्हणजे तारुण्याचे इंग्रजीमधील आद्याक्षर 'वाय'

 कविता म्हणजे वार्धक्यातील जपमाळा ॐ नम: यमाय

कविता म्हणजे नक्की काय?

कविता म्हणजे षड्रस मधुराम्ललवणकटूकषाय

कविता म्हणजे गोर गरिबांनी पिडीतांनी खाल्लेली हाय

कविता म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय

कविता म्हणजे नक्की काय?

कविता म्हणजे सृजनशीलतेशी पाठशिवणी खेळणारा क्षय

कविता म्हणजे नवकल्पनेच्या बीजांना अंकुरणारी धरणीमाय

कविता म्हणजे स्फुल्लीन्गाची पोटुशी गाय

कविता म्हणजे नक्की काय?

कुणी सांगू शकेल काय?

--- वैभव वसंत जोशी, अकोला

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: कविता म्हणजे नक्की काय?
« Reply #1 on: April 30, 2012, 02:46:43 PM »
 
kavita mhnje sakhi
manatl jichya javl bolta yeil
aashi jiva bhabachi maitrin