Author Topic: मी  (Read 877 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
मी
« on: April 29, 2012, 07:48:50 PM »
मी

मी कोण म्हणुनी काय पुससी

जातकुळीच माझी न्यारी

स्वप्नांवर जगणारी

भावनांच्या आवर्तात अन्दोलणारी

वादळात लीलया वावरणारी

गालिब कुलदैवत माझे

मीराबाई कुलदेवता माझी

केशवसुत कुसुमाग्रज ग्रामदैवत

मुक्ताई बहिणाबाई ग्रामदेवी

गोत्र माझे ज्ञानियाचे

नसेन पैशअड्क्याने श्रीमंत

परी माळते मी शब्दांचे गजरे

गळा कंठी भावनांची, पायी पैंजणे कल्पनांची

पापण्यात रेखिते मी, स्वप्नांची काजळ रेखा

असा शाश्वत शृंगार

हदयाच्या गाभाऱ्यात प्रीतदेवतेची प्राणप्रतिष्ठा

चर्येवर कवितेचा मुक्ताविष्कार

भाव्सौन्दार्याचा दिव्य साक्षात्कार

 

यापुढे काय श्रीमंती तुझ्यासारख्या

गडगंज श्रीमंत पामराची !

 

.....................स्वाती मेहेंदळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मी
« Reply #1 on: April 29, 2012, 07:57:57 PM »
Yo....great. Pratek kavisathi ek prerana

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: मी
« Reply #2 on: April 30, 2012, 10:07:26 AM »
Aashay sundar......

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी
« Reply #3 on: April 30, 2012, 01:59:30 PM »
bahot khub...

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
Re: मी
« Reply #4 on: April 30, 2012, 11:32:17 PM »
Saglyana Dhanywad !..tumchya shabdani kharach prerana milte!