Author Topic: एक कविता - अनामिक  (Read 594 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
एक कविता - अनामिक
« on: May 04, 2012, 11:53:00 PM »
शब्दांच्या मागे नको लागुस...
ते तुझे गुलाम आहेत,
तू बोलशील तसे अर्थ ते
तुला समजावून देतील.

सरळ रस्त्याने नको जाऊस...
पायवाट हवीशी वाटेल,
यशाची वाट पहायची...
सवय कशी बरे राहील.

किती चालायचे हे नको ठरवूस...
फक्त चालत राहायचं,
थोडे रडणे जरी असले...
हास्याच औषद त्यावर लावायचं.    - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
« Last Edit: May 05, 2012, 01:25:55 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता