Author Topic: माझ्या कवितेला कुणी.. हात नका लाउ  (Read 486 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
माझ्या कवितेला कुणी..
हात नका लाउ..॥१॥

तिला तसेच ठेवा..
कुणी आस्वाद नका घेउ..॥२॥

माझे शब्द ठेवा तसेच..
त्यांना उष्टे नका करु..॥३॥

पापी ओळी ठेवा तशाच..
त्यांना पवित्र नका करु..॥४॥

दिशाहीन भरकटू दे तशीच..
उगाच वाटा नका देउ..॥५॥

सौजन्यशील नाहीच ती..
तीला संस्कार नका शिकऊ..॥६॥

मलीनच राहु दे बरी..
तीला कुलीन नका करू॥७॥

तीला एकटेच सोडा सारे..
तिच्या बाजुने कुणी नका लढू॥८॥

अपयशी राहु दे तीच्य़ा कडव्यांना..
त्यांना यश नका देउ..॥९॥

अर्थहीन म्हणून सोडून द्या..
उगाच अर्थ नका लाउ..॥१०॥

अंधारात राहु दे तशीच..
तिला प्रकाशित नका करू..॥११॥

विचार आहेच तीच्यात ’वेगळा’..
तीला ’सगळ्या’त नका आणू..॥१२॥

-- विनायक
३/०१/०११