Author Topic: उगवती  (Read 460 times)

Offline kumudini

  • Jr. Member
  • **
  • Posts: 118
उगवती
« on: May 13, 2012, 07:41:26 AM »
      उगवतीकिलबिल पाखरांची

दुरुनीच ऐक़ू  आली

झाली पहाट कळली

सृष्टी फुलून आलीमौक्तिक हे दवाचे

पाचू जळात न्हाले

आकंठ  डूमबुनिया 

असती तिथे विरालेहे किरण भास्कराचे

पाण्यावरी तरंगे

होऊन कांचनाचे

असती तिथे निमालेवाहे खटयाळ वारा

कलीकास जागवाया

उधळून  मुक्त गंधा

गंधालि तीहि झालीसौंदर्य हे धरेचे

वाणीस मौन आणे

गगनास पाहताना

मौनास अर्थ लाभे

           कुमुदिनी काळीकर 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: उगवती
« Reply #1 on: May 15, 2012, 11:51:54 AM »
chan kavita.