Author Topic: माझ्या मातीचा गंध  (Read 709 times)

Offline mrunalwalimbe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 54
माझ्या मातीचा गंध
« on: May 15, 2012, 09:22:29 AM »
माझ्या मातीचा गंध
या धरणीवर   काय नाही ?
या धरित्रीवरच  तर आहे सारे काही
या मातीचा गंध अजून आहे
     माझ्या नसानसात
या जमिनीवरच मी जन्मलो
    वाढलो , मोठा झालो
अरे मग कशाला ध्यास
  तुला सातासमुद्रापार जाण्याचा
तिथे आहे झगमगाट अन_ पैसा
पण वेडया,
    या मातीचा आपलेपणा ,
    या भूमीचा ओलावा ,
    या धरित्रीचा  ऋणानुबंध
    या धरणीचे  ममत्व 
 आहे तिथे , नाही ना
अशा या सुंदर भूमीचे
पांग फेडायचे सोडून
कशाला हवा तुला परदेश आसरा
म्हणूनच म्हणते ,त्यापेक्षा म्हण
करीन सोने या मातीचे
फुलवीन स्वर्ग या धरणीवर
ठेवीन देहही या धारीत्रीवरच
फिरून पुन्हा जन्म घेण्यासाठी
या गंधीत मातीत
             मृणाल वाळिंबे 
« Last Edit: May 15, 2012, 12:03:40 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


किरण भोईर

  • Guest
Re: mazya maticha gandh
« Reply #1 on: May 15, 2012, 11:52:39 AM »
पडणा-या प्रत्येक थेँबात तुझा स्पर्श मला जाणवतोय, 
का कुणास ठाऊक श्रावणसरीँनी मी इतका का बावरतोय....
तुला पाहताक्षणी मी जागीच थिणलो होतो ,
या सरीँनीच मी पुन्हा भानावर आलो होतो ,
तो क्षण मी आजही आठवतोय ,
का कुणास ठाऊक श्रावणसरीँनी मी इतका का बावरतोय....
तुझ्या सहवासासाठी मी इतका का तळमळायचो ,
तेव्हा मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच जगायचो ,
पण आता मात्र मी स्वतःसाठीच जगतोय ,
तरीही का कुणास ठाऊक श्रावणसरीँनी मी इतका का बावरतोय....
तु बोलायचीस तेव्हा मी फक्त ऐकायचो ,
तुझा प्रत्येक शब्द मी ह्रदयात साठवायचो ,
तुझा आवाज आजही या सरीत मी ऐकतोय ,
का कुणास ठाऊक श्रावणसरीँनी मी इतका का  बावरतोय....