Author Topic: प्रेक्षक  (Read 501 times)

Offline mrunalwalimbe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 54
प्रेक्षक
« on: May 19, 2012, 08:26:53 AM »

प्रेक्षक
प्रेक्षक असतो सऱ्या
घटनांचा साक्षीदार
कधी तो असतो
नाट्यगृहात
नाटकाचा प्रेक्षक म्हणून
कधी तो असतो
सिनेमागृहात
चित्रपटाचा प्रेक्षक म्हणून
कधी तो असतो
स्वतःच्याच घरात
दूरचित्रवाणीचा प्रेक्षक म्हणून
कधी कधी तर तो  असतो
स्वतःच्याच छबीत
बरे वाईट प्रसंग बघत
स्वतःच्याच मनात
आत्मपरिक्षण करत
खरे तरं आपण सारेच
आहोत प्रेक्षक या अवनीवरती
अन_ बघत आहोत एक एक
विधात्याचा खेळ
कधी हसत, कधी टाळ्या वाजवत
तरं कधी रडत , कधी दुःख करत
आपली  आपली भूमिका
पार पाडत
          मृणाल वाळिंबे 
« Last Edit: May 19, 2012, 11:35:52 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: प्रेक्षक
« Reply #1 on: May 19, 2012, 11:36:20 AM »
Title suddha Marathi madhye taka....post edited. ..Enjoy MK

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेक्षक
« Reply #2 on: May 21, 2012, 11:04:05 AM »
kya bat hai..... bahot sahi kaha hai.