Author Topic: घर  (Read 731 times)

Offline mrunalwalimbe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 54
घर
« on: May 21, 2012, 11:14:47 AM »
घर
असे असावे घरटे आपुले
जणू काही स्वप्नावणी
असावी सासू आईवाणी 
असावा सासरा बापावाणी 
असावा दिर भावावाणी
असावी नणंद बहिणीवाणी 
दादला असावा सखावाणी
जणू काही प्रेमाचा ओलावा
अन_ मायेचा झरा
 अशी असावी नाती
घट्ट शाल विणल्यावाणी
असे असावे घरटे आपुले
जणू काही मंदिरावाणी
असावी सासू  रखुमाईवाणी
असावा सासरा विठ्ठलावाणी
असावा दिर लक्ष्मणावाणी
दादला असावा नारायणावाणी
जणू काही ज्ञानाचा झरा
अन_ प्रतिभेचा ओलावा
अशी असावी निर्मल नाती
घट्ट एकमेकांना बिलगल्यावाणी

          मृणाल वाळिंबे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: घर
« Reply #1 on: May 21, 2012, 01:27:17 PM »
खूप छान ...

Offline mrunalwalimbe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 54
Re: घर
« Reply #2 on: May 21, 2012, 04:36:06 PM »
thank u for reading poem