Author Topic: हॉटेलातला पोऱ्या.....  (Read 804 times)

हॉटेलातला पोऱ्या.....
« on: June 04, 2012, 05:36:10 PM »
हॉटेलातला पोऱ्या

कोपर्यावरच्या शंकर शेठच्या हॉटेलात...
जेमतेम १०-१२ वर्षांचा....
सगळ्यांच्या हाकेला "आलो साहेब" करत धावणारा...
नाव-गावाचा पत्ता नसलेला...
कुणासाठी गोत्या तर कुणासाठी बाब्या...
टेबल - बाकड्यांशी खेळणारा... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

मळका शर्ट आणि मळकीच चड्डी एक मळका फडका खांद्यावर टाकलेला...
बिन साबणाची आंघोळ तरीही चेहरा सदा खुललेला...
केसांना नसलं तरीही त्याला वळण नक्कीच छान होत...
आई-बाबा नसताना कुणी शिकवलं ठाऊक न्हवत..
एवढ्याशा देहात त्या प्रचंड उत्साह होता...
धरणी त्याची माय आणि आभाळच बाप होता....
पोरका असूनही नसलेला... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

कोणीही काहीही हाक मारावी...
कधी कधी तर हाकेबरोबर एखाधी शिवी देखील हसडावी...
पण प्रत्येकालाच त्याने हसत हसतच ओ द्यावी...
एका हाकेला मात्र तो नेहमीच कान टवकारी....
शंकर शेठ त्याला जेव्हा त्याच्या नावाने हाक मारी..
घना म्हणजेच घनश्याम नावाचा..  तो एक हॉटेलातला पोऱ्या..

पाहते सूर्याला तोच उठवतो...
आचार्याने बनवलेला पहिला चहा त्याला पाजतो...
कदाचित मगच सूर्य नारायण त्याच्या कामावर निघतो...
चिमुकल्या पावलांनी पोरगा तुरु तुरु धावत असतो...
चपळाईने टेबल बाकड चकाचक करून टाकतो...
नुसता अर्धा चा आणि एक पाव पदरात पडतो....
तोच गट्टम करून कमाल लागतो... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

भुकेलेल्यांना हव ते देऊन तृप्त करायचं...
आणि पोटातल्या कावळ्यांना पाणी पाजून शांत करायचं...
दिवस भर काम करून करून दमायच...
आणि वेळ मिळालाच तर चार घास खाऊन घ्यायचं...
नाहीतर संध्याकाळचा चा-पाव आहेच ठरलेला...
स्वताच असा काहीच नसलेला... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

रमत गमत.. पेंगत टळलेली रोजचीच दुपार...
सांजवेळी पुन्हा एकदा टेबल बाकड पुसून पोरगा तयार...
चहा, नाश्ता जेवण सगळ on time आणून देणार...
झालीच जर गडबड चुकून तर मालकाच्या शिव्या खाणार...
जास्त काही झालंच तर एक दिवसाचा पगारही जाणार.... आणखी काय होणार...
दोन मुके अश्रू गिळून ते चिमुरड पुन्हा गाणी म्हणणार..
तरीही गिर्हाईकाचा पडलेला रुपयाहि परत करणारा.. तो एक हॉटेलातला पोऱ्या..

आई नाही बाप नाही...एकटाच लेकरू जस हरवलेलं कोकरू...
रोजचा दिवस येईल तसा ढकलत चाललंय...
दिवसभर त्या देबळ बाकड्यांशी खेळतंय..
आणि रात्रीच्या वेळी त्यातल्याच एका टेबलावर कसतरी झोपतंय....
थंडीच अंथरून आणि थंडीचच पांघरून...
रात्री पडायच्या भीतीने झोपतो देखील सावरून...
रात्रीच्या कुशीत शिरून.. स्वत साठीच एखादी सुरेल अंगी गातोय...
मिटलेल्या पापण्यांमध्ये एक सुंदरस स्वप्न साठवतोय... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

- शिल्पा लिमकर (शैलजा)
« Last Edit: June 05, 2012, 12:13:48 PM by shailja »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: हॉटेलातला पोऱ्या.....
« Reply #1 on: June 05, 2012, 11:31:18 AM »
kavita khup chan aahe.... pan hi konachi kavita aahe. tumchi asel tar tumach nav krupaya liha...

Re: हॉटेलातला पोऱ्या.....
« Reply #2 on: June 05, 2012, 12:14:54 PM »
Thanks for comments and suggestion too... :)
update kela my name in post.. Kavita majhich ahe.. :)

Offline umesh Tambe

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male
Re: हॉटेलातला पोऱ्या.....
« Reply #3 on: June 05, 2012, 01:06:04 PM »
छान आहे कविता....

Offline mylife777

 • Newbie
 • *
 • Posts: 33
 • Gender: Male
 • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
Re: हॉटेलातला पोऱ्या.....
« Reply #4 on: June 13, 2012, 10:06:56 AM »
पोऱ्या हा shabd वेगळा वाटतो. mhanje स्त्री प्रधान वाटतो