Author Topic: ढग डवरले.  (Read 676 times)

Offline Dr.Vinay Kalikar

 • Newbie
 • *
 • Posts: 31
ढग डवरले.
« on: June 23, 2012, 12:33:33 PM »
शांत तळ्यावर
तरंग उठले ,
निळ्या नभावर
ढग डवरले.

तप्त धुळीवर
थेंब ओतले ,
गंध सुगंधित
विश्व बहरले.

उष्ण किरणांवर
दंव पसरले ,
लोह गोलावर
ढग डवरले.

पाना पानांवर
नभं  विसावले,
तरू वेलींवर
तारे हि हुलले . 

सप्त सुरांवर
ढग डवरले ,
फांदी न फांदीचे
स्वर उमटले .

आली धरेवर
रिमझिम तान,
सृष्टी चराचर
होई बेभान .

__विनय काळीकर __
___नागपूर__________

Marathi Kavita : मराठी कविता


Offline lelekedar

 • Newbie
 • *
 • Posts: 9
Re: ढग डवरले.
« Reply #1 on: June 24, 2012, 04:18:06 PM »
good one

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ढग डवरले.
« Reply #2 on: June 25, 2012, 11:59:11 AM »
kavita aavadli....