Author Topic: पुन्हा पाउस  (Read 1236 times)

Offline lelekedar

 • Newbie
 • *
 • Posts: 9
पुन्हा पाउस
« on: June 25, 2012, 11:00:39 PM »
काळ्या सावळ्या ढगांचे
आकाशी पसरले जाळे
चराचर आसुसले सारे
स्वागत कराया पाउसचे

उघड्या डोंगर रांगांनी
पांघरले हिरवे शेले
दऱ्या खोर्यांवर पसरले
शुभ्र धुक्याचे गालिचे

चिंब झाडे चिंब वेली
चिंब रान झाले
कड्या कपर्यानी केले
रिते घाट दुधाचे

काळ्या मातीने शिंपले
अत्तर मृद गंधाचे
हे पर्व आनंदाचे
हे पर्व सृजनाचे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पुन्हा पाउस
« Reply #1 on: June 26, 2012, 12:34:42 PM »
chan kavita.....
 
चिंब झाडे चिंब वेली
चिंब रान झाले
कड्या कपर्यानी केले
रिते घाट दुधाचे

 
ekdam chan varnan

Offline mrunalwalimbe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 54
Re: पुन्हा पाउस
« Reply #2 on: June 26, 2012, 02:33:39 PM »
फारच सुदंर