Author Topic: एक झिम्मड पाउस  (Read 835 times)

एक झिम्मड पाउस
« on: June 26, 2012, 12:02:26 AM »
एक झिम्मड पाउस घनघोर बरसणारा
धरित्रीच्या शेल्यावर  मारवा पाचु उधळणारा   || १ ||

एक झिम्मड पाउस रानात गुंजणारा
मोराच्या पायात ताल होऊन थिरकणारा || २ ||

एक झिम्मड पाउस कड्यावर कोसळणारा
सागराच्या ओढीने दुथडी भरून वाहणारा || ३ ||

एक झिम्मड पाउस  झाड-झुडूपांचा आसरा घेणारा   
हळव्या क्षणांचा सोबती अळवावर ठरू पाहणारा || ४ ||

एक झिम्मड पाउस समुद्रात मिसळणारा
डोळ्यातले खारे पाणी जणु गोड करु धडपडणारा || ५ ||

एक झिम्मड पाउस शिंपल्यात सामावणारा
मोतियाच्या रूपाने पुनर्जन्म घेऊन राहणारा  || ६ ||

एक झिम्मड पाउस वाळवंटात भरकटणारा
वाळुच्या कणाकणात स्वतःचे अस्तित्व विसरणारा || ७ ||

असाच एक झिम्मड पाउस मनात माझ्या डोकावणारा
अन त्याला भिजवण्याच्या नादात मीच काय तो कोरडा उरणारा || ८ ||
« Last Edit: June 26, 2012, 06:50:42 PM by कुसुमांजली »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: एक झिम्मड पाउस
« Reply #1 on: June 26, 2012, 12:32:35 PM »
sundar kavita... :)

Re: एक झिम्मड पाउस
« Reply #2 on: June 26, 2012, 06:52:30 PM »
धन्यवाद केदार.

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: एक झिम्मड पाउस
« Reply #3 on: June 29, 2012, 09:48:32 PM »
आवडली !