Author Topic: प्रत्येक कवितेचे एक नशीब असते .  (Read 638 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76

कविता कधीही जमून जाते
कविता कधीपण फुलून येते
कविता अवचित खुलून जाते
कशी होते .?कधी होते ..?
कळत नाही
प्रत्येक कवितेचे आपले आपले एक नशीब असते


कविता गर्दीत फुलते
कविता स्वप्नात झुलते
उगाच गाणे गाऊन जाते
कशी गाते ..?कशी फुलते .?
कळत नाही ....!!


कधी कविता खूप गाजते
कधी कविता खूप लाजते
कधी कविता सुंदर असते
कधी कुरूप जन्म घेते
असे होते ..का होते ..?
कधी होते ..?
कळत नाही..!
झिम्म पाउस पडत असतो
मस्त ढग भरून जातात
कविता येईल असे वाटते
मन पावसात भिजून जाते
तरी मनाच्या मातीत
कवितेचा हुंकार फुलत नाही
असे का होते..? कळत नाही ...!!
चक्क उन्हाळा नि गरम हवा
चिंब घाम .....!
नि अचानक कविता फुलून जाते
चक्क ढगासारखी बरसून जाते
वीज होऊन चमकून जाते
त्या वीज कल्लोळात चमकून जाते .....


कविता अचानक येते
झुळझुळ रुणुझुनत येते
हलकेच तिला बंद करावी
अलगद तिला कवेत घ्यावी
नाहीतर ती हरवून जाते
हवा होऊन विरून जाते......!
शप्पत ..!!
प्रत्येक कवितेचे आपले आपले एक नशीब असते ....!!


-- Prakash