Author Topic: तो  (Read 736 times)

Offline bava1984

  • Newbie
  • *
  • Posts: 6
तो
« on: July 28, 2012, 11:20:38 AM »
                         तो
ज्याला जे जे हवे तो ते करून गेला
जो जिंकावयास आला तो एकटाच हरून गेला

लोक जमले हो मयताला हाताची घडी घालून
तो हात मोकळे सोडून केंव्हाचा मरून गेला
 
तो  पाण्याविना अखेरी तडफडला तिरडी वरती
हा मटका खांद्यावरती नंतर पाझरून गेला

त्याचे गणित बरोबर आले एकदाचे
पण हाताचा का  आकडा शेवटी उरून गेला .

हे केवड्याचे शब्द शोधून आणले मी
पण मागून धोतरा हा उगा बहरून गेला .

ना सापडला पुरावा रक्ताचा अन सु-याचा
बहुतेक खुनी दरोडा सावकाश आवरून गेला     
                                    भूषण दत्ताराम भुवड 
« Last Edit: August 08, 2012, 08:56:54 PM by bava1984 »

Marathi Kavita : मराठी कविता