Author Topic: मनाची सुंदरताच...  (Read 1076 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मनाची सुंदरताच...
« on: August 04, 2012, 08:31:58 PM »
" चेहरा कितीही सुंदर असला तरीही मन सुंदर असावयास हवे. जर मन शुद्ध नसेल तर त्या सुंदर चेह-याचा काय उपयोग. म्हणून सुंदर पवित्र आणि शुद्ध मन ठेवा. ते मन स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र परिवारास, नातेसंबंधितांना आनंदित, समाधानी ठेवेल. यातूनच ईश्वरी कृपेची अनुभती घ्या आणि ती निश्चित मिळेल याची खात्री बाळगा."  - प्रदीपकुमार केळकर

            मुळ विचार प्रदीपकुमार केळकर यांचे आहेत . त्यांच्या इच्छेनुरूप मी त्यांच्या प्रगल्भ विचारांना काव्यरूप दिले आहे. त्यांच्या अनुमतीने मी केलेली ही कविता तुम्हाला अर्पण करत आहे मित्रांनो.   

चेहेऱ्याचे रंग रूप...
असो कितीही छान,
मनाची सुंदरताच...
शेवटी करते महान.

कलुषित, ग्रासलेल मन...
न देई कसलीच सुंदरता,
फासून लाख प्रसाधने...
न येईल ती उदारता.

पवित्र,शुद्ध विचारी मन...
करील आनंदी चारही दिशा,
नातलग,मित्रपरिवारात...
नांदेल सुख-समाधानाचा वसा.

ईश्वर मनी तेच असते...
जे तुम्ही चिंतिता,
स्वच्छ मनी वाहुद्या...
सदा सुविचारांचा झरा. -  मुळ विचार  (प्रदीपकुमार केळकर) , कविता अनुवादन (हर्षद कुंभार)
« Last Edit: August 04, 2012, 08:33:38 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता

मनाची सुंदरताच...
« on: August 04, 2012, 08:31:58 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मनाची सुंदरताच...
« Reply #1 on: August 06, 2012, 12:20:38 PM »
म्हणूनच कविता मला एखाद्या शिल्प कृती सारखी वाटते. मोठा दगड फोडून त्याचा काही भाग काढून टाकून सुंदर शिल्प बनते. कवितेचे हि तसेच आहे. मोठ्या उतारयातून एक छोटीशी कविता बनते. अर्थ आणि भाव तोच असतो पण शब्द मात्र कमी होतात.    कविता आवडली...

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मनाची सुंदरताच...
« Reply #2 on: August 07, 2012, 10:27:56 PM »
thanx Kedar ekdum barobar bolalat tumhi, tyanchya vicharana mi yogya nyay devu shakalo yatach mala bharun pavale,

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: मनाची सुंदरताच...
« Reply #3 on: August 09, 2012, 01:53:56 PM »
नमस्कार ,
  आपण श्री.प्रदीपकुमार केळकर यांच्या  बद्दल  काही  कळवाल  का ?

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मनाची सुंदरताच...
« Reply #4 on: August 09, 2012, 10:43:20 PM »
Vikrant , tumhi .प्रदीपकुमार केळकर yana Facebook madhe sampark karu shakato,

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):