Author Topic: भारत प्रगत झाला  (Read 644 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
भारत प्रगत झाला
« on: August 12, 2012, 08:29:29 PM »
गाडीत प्रवास करतांना
एक भिकारी भेटला
भीक म्हणून दोन रुपयाचा
कॉईन मी दिला
स्टेशन आल्यावर तो हि
माझ्या मागे उतरला
म्हणाला चल मित्रा
चहा पाजतो तुला
आग्रह करून टपरीवर
मला घेऊन गेला
दोन कटींगची ओर्डर 
देऊन मोकळा झाला
कटिंग आहे पाच रुपये
हळूच मला म्हणाला
घाबरू नका मी देतो
खिशात हात घातला
दोनचा कॉईन घेवून
पाचचा मी दिला
बिल चुकते करून
मी मोकळा झाला
हळूच गालात हसून
पुन्हा भेटू म्हणाला
त्याला सलाम करून
मी चालता झाला
वाटले तेव्हा मनास
भिकारीही ग्लोबल झाला
खऱ्या अर्थाने भारत
आज प्रगत झाला .

Marathi Kavita : मराठी कविता