Author Topic: “मला विचाराल तर....”  (Read 1308 times)

Offline SATISHGAVHALE1970

 • Newbie
 • *
 • Posts: 14
“मला विचाराल तर....”
« on: August 18, 2012, 04:25:05 PM »
“मला विचाराल तर....”
मला विचाराल तर
नम्रतेने कमरेत वाकणारेच
वादळात पुन्हा उभे राहतात
मोडलेले ताठ वृक्ष तरी
दुसर काय सांगतात

मला विचाराल तर
बुडायला अथांग सागराची
आवश्यकता असतेच अस नाही
बुडणाऱ्याला काय
पुरतो दारूचा फक्त एक प्याला

मला विचाराल तर
शंकराच एकाच दुख होत
भाळी असला चंद्र जरी
शीघ्रकोपी म्हणूनच
त्याच नाव झाल होत
 मला विचाराल तर
द्रौपदीच एकच दुख होत
द्रौपदी पाच जणांची पत्नी
असूनही असे
द्रौपदीचा मात्र एकही पती नव्हता

मला विचाराल तर
कोळशापेक्षाही काळ
मानसाच मन असत
कोळशाने लिहलेल काळ
कधीतरी उजेडात येत
मनातले काळ मात्र
तसच अंधारात राहत
 
मला विचाराल तर
स्त्रीत्व
डोईवरल्या टिकलीएवढे
कधीच लहान नव्हत
स्कर्ट ब्लाऊज मध्ये
स्त्रीत्व मावत नाही अस ते म्हणतात
नववारीलाही माडीवर
कधीतरी पहिल्याचही ते सांगतात
सीताही कुंकू लावायची
अहिल्येचाही गळ्यात मंगळसूत्र होत
असूनही अस
पाच पतींची पत्नीही पतिव्रता होती

मला विचाराल तर
देवाची पूजा करण्यात
काहीच अर्थ नव्हता
प्रत्येक देवाच्या जन्मामागे
एक सैतान दडला होता

मला विचाराल तर
रावणामुळेच रामाला किमत असते
रावणही वीर रामही वीर
रावणाने सीतेला पळवल्यावरच
रामायण घडते

मला विचाराल तर
अधर्माचाच संबध धर्माशी असतो
म्हणूनच माणुसकी शिवाय
हिंदू मुस्लीम क्रिश्चन
दाही दिशांना फोफावत असतो
 
मला विचाराल तर
संसाराच्या रथाला
दोन चाकं असतात
एक प्रेम दुसरे तडजोड

मला विचाराल तर
रावणाचा पराभव होणारच होता
दहा तोंडाचा रावण
फक्त दोन कानाचा होता

मला विचाराल तर
उत्तराच्या आशेने
आपणच प्रश्न उभे करतो
मिळालेल्या प्रत्येक उत्तरात
एक नवाच प्रश्न शोधत राहतो

मला विचाराल तर
प्रत्येक मनात
एक देव्हारा असतोच
पूजा करावी अशी
मूर्ती शोधण्यातच
आयूष्याची संध्याकाळ होते
 
मला विचाराल तर
वैधव्य काय
फक्त नवरा मेल्यावरच येत
नवऱ्याच्या पोटात बाटली गेल्यावर
जे येत
वैध्व्यापेक्षा का ते वेगळ असते

मला विचाराल तर
जगायला या जगात
तरी फार काय लागत
पडताच सूर्याची कोमल किरणे
पहीली झोप पूर्ण होते
निद्रिस्त कळ्या फुलायलाही
फक्त मायेची उब लागते
 
मला विचाराल तर
प्रेम हे त्यागातही नसते
पेम हे भोगातही नसते
स्वच्या जाणीवेला फुंकर घालत
वडाच्या पारंब्यासारख
खोल खोल रुतलेल
प्रेम आपल्या मनातच असते – सतीश लक्ष्मण गव्हाळे


« Last Edit: August 23, 2012, 05:10:43 PM by SATISHGAVHALE1970 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: “मला विचाराल तर....”
« Reply #1 on: August 20, 2012, 12:05:04 PM »
mal vatat pretek kadvyachi ek kavita hou shakli asti.

देवाची पूजा करण्यात
काहीच अर्थ नव्हता
he explain karayala have .
aso. welcome.
« Last Edit: August 20, 2012, 12:07:16 PM by विक्रांत »

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: “मला विचाराल तर....”
« Reply #2 on: August 21, 2012, 01:52:17 PM »
chan chintan aahe.....
 
 

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: “मला विचाराल तर....”
« Reply #3 on: August 25, 2012, 06:28:30 PM »
Barech wichar ekdum!!

samikshak

 • Guest
Re: “मला विचाराल तर....”
« Reply #4 on: September 02, 2012, 07:30:09 AM »
satish,
   kavitet chintan chaan aahe. pan...   “मला विचाराल तर....” he shirshak tumhi ka dilat?  kavitecha shirshak he tya kavitechi olakh asate. kavita vaachatana he shirshak ka dila asa vaachakanchya manaat prashn nako yayala.
    mhanaje te chukicha aahe asa mala mulich mhanayacha naahi. kadachit te denyamaage tumacha kaahi hetu asanyaachi shakyata naakarata yet naahi.
    ...pan मला विचाराल तर.... yaa olini pratyek kadavyachi suravat hote. tyaamule kaahich arthbodh hot naahi ase maaza vaiyaktik mat aahe......

     ..... samikshak....