Author Topic: सत्तेच्या चाव्या चोरांच्याच हातात आहे  (Read 875 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
एक लाख चौर्यांशी हजार कोटींचा भ्रष्टाचार
पंतप्रधानाच्या खात्यात झाला आहे
काळा पैसा सारा बाहेर देशात
मंत्री  व अधिकाऱ्यांचा जमा  झाला आहे   
या सर्व खादाडांना तर भर चौकात
फाशी देण्याची वेळ आली आहे
हे कॉंग्रेस सरकार भ्रष्टचार्यांना
गोळ्या घालण्याची वेळ आली आहे   
लाखो रुपयांचा घोटाळा करून यांनी जनतेला
महागाईच्या भस्मासुरात ढकलून दिले आहे
पंतप्रधानांपासून ते भ्रष्ट मंत्री व सरकारी अधिकारी
यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे   
सर्व वाममार्गान कमावलेला पैसा
सरकारन जप्त करण्याची वेळ आली आहे
पण असं  होऊच शकणार नाही
कारण सत्तेच्या सगळ्या चाव्या
या चोरांच्याच हातात आहे
नियोजन आयोगानं  गरिबीची व्याख्या बावीस रुपये केली आहे
मग यांचीच भूक कशी काय इतकी वाढली आहे. 
 
« Last Edit: September 03, 2012, 12:59:27 PM by SANJAY M NIKUMBH »

Marathi Kavita : मराठी कविता


RAKESH343

  • Guest
Re: गरिबीची व्याख्या
« Reply #1 on: August 28, 2012, 02:02:36 PM »
vastavvadi kavita