Author Topic: पाऊस येताच...  (Read 873 times)

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
पाऊस येताच...
« on: August 29, 2012, 08:53:44 AM »
पाऊस येताच
धरेचा कण अन् कण
मोहरतो सारा,
तैसाच पाऊस येता
कवीचे घरा,
माहीत नाही का,
पण तोही
अंतरंगातूनी मोहरतो वेडा,
,
मग पाऊस आपला कोसळतो
अन् कवी फेर धरतो बसल्याजागी,
पाऊस पावसासारखा
दिसतच नाही त्याला,
उगाच सुचते काहीबाही,
,
समोरच्या डबक्याचा मग होतो तलाव
ऐकू येते कुठूनशी डराव-डराव,
अदृश्यसा नाचताना दिसतो मोर
जरी कावळा भिजत बसलाय समोर,
,
मग आभाळ, आभाळ नसतच त्याच्या लेखी
ते असतं भरून आलेलं मन,
कोसळणाऱ्‍या सरी मग होतात आठवणी
त्यात हुरळून हरपतो, हरवतो कवी,
,
होत राहतो कागद पांढऱ्‍याचा काळा
कित्येक तास चालू राहतो हा सिलसिला
,
बाहेर पाऊस कधीचाच बरसून गेला
पण इथे अजुनही कवितांनी होतोय
कवीचा उंबरठा ओला............
.
-व्टिँकल देशपांडे.
« Last Edit: August 29, 2012, 08:54:47 AM by Tinkutinkle »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पाऊस येताच...
« Reply #1 on: August 30, 2012, 11:03:30 AM »
mast kavita..... khar varanan aahe kavich.

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
Re: पाऊस येताच...
« Reply #2 on: September 03, 2012, 01:57:35 PM »
Khup khup aabhar :)