Author Topic: सांग मला, जरा पुन्हा एकदा.....नव्या-जुन्याची व्याख्या काय ?  (Read 783 times)

Offline Tinkutinkle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 58
सांग मला जरा
पुन्हा एकदा
नव्या-जुन्याची व्याख्या काय ?
,
जुनेच पुस्तक पुन्हा चाळता
नवे वाटल्यास, म्हणायचे काय ?
,
जुनेच हास्य, जुनाच हुंदका
पुन्हा दाटल्यास
म्हणायचे काय ?
,
तीच जुनी सर, घेऊन नव नभ
जुनाच पाऊस पुन्हा बरसला
तर त्यास म्हणायचे काय ?
,
जुनीच कविता पुन्हा नव्याने
मांडली मी जर
तीसही म्हणायचे काय ?
,
जुनाच तबला
जुनीच पेटी,
तरी उमटती सूर नवे,
जुनेच गीत नव चालीत गुंफले
तर त्यास म्हणायचे काय ?
,
जुनीच पहाट
रोज नव्याने
रंगविते आकाश नवे,
,
जुनीच रात
रोज नव्याने
लेवून येई चांदणे नवे,
,
सांग मला
जरा पुन्हा एकदा
नव्या-जुन्याची व्याख्या काय ?
,
तीच जुनी मी, तेच जुने मन,
तेच माझे ह्रदय जुने,
रोज नव्याने जगले मी जर
तर मज तरी म्हणायचे काय ?
.
- व्टिँकल देशपांडे.