Author Topic: आम्ही अशी फुले ...  (Read 629 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आम्ही अशी फुले ...
« on: September 09, 2012, 11:24:21 PM »
हीच कविता चित्रकवितेत पहायची असेल तर येथे क्लीच्क करा .. 
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_5018.html


           आम्ही अशी फुले ...

आम्ही अशी फुले की  बाजार पाहिलेली
येऊन बाजारी परि  निरपेक्ष राहिलेली ।
घेण्यास विकत आम्हा  येतो कधीं कुणीही
हुंगून क्षणभराने  फेंकून देतो कुठेही ।
येते कधीं सुनयना  कुरवाळीते ती आम्हा
मिरविते ती दिमाखे  घेऊनि संग आम्हा ।
येतो कधीं कुणी  भक्ती भावे विकत घेतो
हळुवार त्या कराने  देवास तो वहातो ।
पण एक दिन जीवनी आमच्या असा येतो
निर्माल्य होऊनि तो   सरीतेत झेंप घेतो ।
येतो   कधीं कुणी आम्हा  विकत घ्यावयाला
प्रेतावरी आदराने  आम्हास वाहण्याला ।
प्रेतावरी पडुनि आम्ही  रुदन मुके करतो  ।।           

रविंद्र बेंद्रे

Marathi Kavita : मराठी कविता

आम्ही अशी फुले ...
« on: September 09, 2012, 11:24:21 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):