Author Topic: हसण्याचे उपचार  (Read 1004 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
हसण्याचे उपचार
« on: September 10, 2012, 03:04:21 PM »
 हासण्याच महत्व आम्ही जाणतो
उपचार म्हणून रोज आम्ही
सगळ्या प्रकारांनी हसतो.
 
नियमित हसण्या साठी आम्ही
लाफ्टर क्लब जॉईन करतो
रोज सकाळी बागेत जमून
ठराविक पद्धतीच हसतो
 
घरी सुध्धा टीव्हीवर
लाफ्टर च्यालेंज बघतो
हसण्याच्या म्यूझिकवर
आम्ही सुध्धा खूप हसतो
 
गाडीत सीट मिळाल्यावर
विजयी हास्य करतो
बॉस समोर आल्यावर
लाचारीने हसतो
 
ट्याक्सं ब्र्याकेट वाढल्यावर
समाधानानी हसतो
महागाईचा आकडा ऐकून
कुत्सिकपणे हसतो
 
ओळखीचं कुणी दिसल्यावर
खोट खोट हसतो
राजकारण्यांच्या हसण्याला  मात्र
खोट आम्ही म्हणतो
 
हसण्याच्या या सवयीचा
चांगलाच फायदा होतो
पेपर वाचतानाही आम्ही
पोट धर धरून हसतो
 
हासण्याच महत्व आम्ही जाणतो
उपचार म्हणून रोज आम्ही
सगळ्या प्रकारांनी हसतो. :(
 
केदार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: हसण्याचे उपचार
« Reply #1 on: September 10, 2012, 04:16:32 PM »
ha ha ha ha
mast lihilees re............

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: हसण्याचे उपचार
« Reply #2 on: September 12, 2012, 02:46:34 PM »
hasnyache prakar ,upchar, aavadle,
ehte matr mi khar khar hasto.

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
Re: हसण्याचे उपचार
« Reply #3 on: September 13, 2012, 01:15:32 AM »
गाडीत सीट मिळाल्यावर
विजयी हास्य करतो
बॉस समोर आल्यावर
लाचारीने हसतो

ट्याक्सं ब्र्याकेट वाढल्यावर
समाधानानी हसतो
महागाईचा आकडा ऐकून
कुत्सिकपणे हसतो

ओळखीचं कुणी दिसल्यावर
खोट खोट हसतो
राजकारण्यांच्या हसण्याला  मात्र
खोट आम्ही म्हणतो

  va va masatch.
     hasanyaache baarik aani chintanatmak nirikshan nondavale tumhi kavitetun.