Author Topic: श्रावणातल्या सरींनी …  (Read 626 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
श्रावणातल्या सरींनी …
« on: September 19, 2012, 10:14:55 PM »

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा ..
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_19.html

श्रावणातल्या सरींनी …

श्रावणातल्या सरींनी  सौंदर्य तें निर्मिले होते
मुग्ध त्या सुमनांवर  मोती बिंदू  ठेवले होते ।
झर झर त्या सरींनी  आसमंत भिजविला  होता
करपलेल्या मातीततून  मधूर गंध भरला होता ।
सरी मागून सरींनी  वृक्ष झाडे धुतली होती
त्यामुळे सारी सृष्टी टवटवीत झाली होती ।
त्या अवखळ सरींनी तरुण काया भिजविली होती
भिजलेल्या आवरणातून आकर्षक गोलाई दिसत होती ।
श्रावणाची एकेक सर  जेथे जेथे पडत होती
तेथे तेथे आगळेंच  सौंदर्य  निर्मित होती  ।।

 रविंद्र बेंन्द्रेMarathi Kavita : मराठी कविता

श्रावणातल्या सरींनी …
« on: September 19, 2012, 10:14:55 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):