Author Topic: काळा सवे धांवताना...  (Read 577 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
काळा सवे धांवताना...
« on: September 22, 2012, 10:46:50 PM »
.

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_22.html

काळा सवे धांवताना...

मनांत लपल्या मोराला  भावनांचा चारा देतो .
बहकलेल्या भावनांना  मनामध्ये  थारा देतो ।
रात्रीच्या अंधाराला  जीवनांत समावून घेतो
जीवनांतील प्रकाशाला मनांत कोंडून ठेवतो ।
स्मृतींच्या आठवणीने जीवनाला उजाळा देतो
उजळलेल्या स्मृतींमागे ऊर फुटे पर्यंत पळतो ।
जीवन रखडत आहे परि काळ पुढे धांवतो
काळा सवे धांवताना मागे वळवळून पहातो  ।।

   रविंद्र बेंद्रे
« Last Edit: September 22, 2012, 10:48:08 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: काळा सवे धांवताना...
« Reply #1 on: September 24, 2012, 12:04:41 PM »
kyaa baat hai