Author Topic: अलिकडे रोज सकाळी  (Read 635 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
अलिकडे रोज सकाळी
« on: September 25, 2012, 11:45:36 PM »
अलिकडे रोज सकाळी
पाखरांची गोड चिवचिव
मला ऐकू येतेय
आणि माझी सकाळ
सुरमयी होतेय
गाड्यांच्या आवाजाच्या
मधील निस्तब्धतेत
मनावर जणू तरंग उमटतात
रिक्ष्यांचे केकाटणारे आवाज
जेव्हा पार्किंगला स्थिरावतात
नाक्यावरून गाड्या जेव्हा
विना हॉर्न जातात
वाटते जणू आपण बसलोय 
कुठल्यातरी उद्यानात
एक दिवस ती गोड पाखरे
नीट पहावीत म्हणून
मुद्दाम राहिलो गच्चीत बसून
लक्षात आले आवाज येतात
शेजारच्या गच्चीतून
पाहता तिथे डोकावून
दिसला मोठा पिंजरा
ठेवलेला पाखरे भरून
त्यांना तसे पाहून
गेलो मी विषण्ण होऊन
कळले मला माझी ती 
प्रभातही आहे कृत्रिम
तरीपण
त्या पक्षांचे गाण
होते इतके सुंदर की
पिंजरा भिंती अन
ध्वनिप्रदुषण भेदून
माझ्या हृदयात येवून
बसले घर करून
कैद्याच प्राक्तन
आपले स्वीकारून
फुलत होते जीवन
रडणे नाकारून

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: अलिकडे रोज सकाळी
« Reply #1 on: September 26, 2012, 11:07:01 AM »
एकाचे विलाप.
दुसर्या साठी
गोड चिवचिव.   
 
सुरमयी सकाळी 
कैद्यांचे सूर.
नशीब ज्याचे त्याचे.     
 
 
केदार..
« Last Edit: September 26, 2012, 11:07:25 AM by केदार मेहेंदळे »

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: अलिकडे रोज सकाळी
« Reply #2 on: September 26, 2012, 05:27:30 PM »
पुन:धन्यवाद