Author Topic: नौकरी...  (Read 716 times)

Offline Sameer Nikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 51
  • Gender: Male
  • Sameer Nikam
नौकरी...
« on: September 28, 2012, 03:26:31 PM »
नौकरी...

रोज सकाळी कामाला जायायची घाई
न व्हावा उशीर मला म्हणून
कितेकदा आवाज देत आई
 
चंदेरी स्वप्नांच्या दुनियेतून
उठे मी डोळे चोळत
वाटे निजावे अजून काही क्षण
साखरझोपेच्या झोळीत
 
घेवूनीया गरमागरम डब्बा
पडतो मी घराबाहेर
रोज प्रमाणे  झालाय
आजही मजला उशीर
 
ऑटो ऑटो करत
घशाला कोरड पडत
आज काय नवे कारण द्यावे
याची मनात भीती दाटत
 
पाऊल पडताच पहिले ऑफिसात
बघे मान उंचाऊन म्यानेजर 
शोधी वाट बसण्याची खाली मान घालत
वाटे नाही कुणी आले उशिरा आजवर
 
घेवूनीया मोठा श्वास
फिरती नजर फाइलच्या डोंगरावर
जाणुनी  आजही होणार जीवाला त्रास
पडती त्यामुळे आट्या कपाळावर 
 
नाही राहे भान मजला
दुपारच्या जेवणाची
होई सुरवात धडपडीला
वेळेआधी काम आटपण्याची

नाही कोणी कुणाच्या मदतीला 
कळून आले आहे मजला
होणार आजही  उशीर
घरी मला निघायला  


कृपया कविता वाचल्यावर आपल्या प्रतिकिया द्याव्या कारण मी या क्षेत्रात नवीन आहे धन्यवाद
समीर स निकम

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: नौकरी...
« Reply #1 on: September 28, 2012, 04:43:36 PM »
laukar nije laukar uthe
tyaasi dhan, sampati paisa mile
 
aani office la velevar jayala mile
 
 :D