Author Topic: जोर पांढर्या टोपीचा ...  (Read 401 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जोर पांढर्या टोपीचा ...
« on: October 04, 2012, 09:37:52 PM »
http://i49.tinypic.com/2liisg8.png[/img]]
जोर पांढर्या टोपीचा ....
जोर पांढर्या टोपीचा  फक्त  त्यांच्या तोंडात  असतो                                         
जगासाठी उपदेश एक  स्वतः साठीं दुसराच असतो ।
नामावळ ह्यांची मोठी  कृत्यें मात्र खोटी आहेत
सगळे ह्यांचे पुढारी अनितीचे पुतळे आहेत ।
पांढर्या टोपीची एक जात  काळाबाजार करीत आहे                                       
अन्नधान्यांत विष घालून  भेसळ करून विकते आहे ।
जात बागाईत दारांची   ह्या टोपी आड लपली आहे
धान्यसाठे लपवून   कृत्रिम दुष्काळ पाडित आहे । 
पांढर्या टोपीच्या हावेला  काहीं एक सुमार नाहीं                                             
कारण ह्यावर काहीं सुद्धा   कारवाई केली जात नाहीं ।
कारवाई करील कोण  सर्वच हात बरबटले आहेत
खिसे अन पोटे त्यांची   दिवसेदिवस फुगत आहे।
सर्वच पुढारी ह्यांचे   ह्याच एका नीतिचे
नांवे हुद्दे सांगू किती  सारेच एक जातीचे ।
पांढर्या टोपीत लपलेल्या  ह्या भांडवलदारांचा                                                         
घोष मात्र चालला आहे  जगांत समाजवादाचा ।
येईल कसा समाजवाद  सांगा आमच्या देशात
संपती भरली आहे  सर्वच मंत्र्यांच्या घरांत ।
जनतेला फसवून परि  दंडूक्याने राज्य करताहेत
शांतीच्या बुरख्या आड  अत्याचार लपविताहेत ।
निवडणुकांचा देखावा  देशांत हे करताहेत
खोट्या निवडणुक यंत्राने  त्या ते जिंकताहेत । 
लोक गप्प बसले तरी  काळ काही थांबणार नाहीं                               
शंभर पापे भरल्यावर  तो ह्यांची गय करणार नाहीं  ।। 
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_4.html
   
     

Marathi Kavita : मराठी कविता