Author Topic: ओंडका होऊनच दर्यास जाऊन बिलगतो ,,,,,,,,,,,,,,,,,,,  (Read 400 times)

Offline moraya

  • Newbie
  • *
  • Posts: 13
प्रत्येक गोष्टीची सुरवात आपण करतो               |
पण त्याचा शेवट मात्र नेहमी  अधांतरीच असतो ||

जीवन रुपी या सरीतेत  पडताच
हात हलवने हा त्याचाच भाग असतो            |
हात हलवता हलवता आपण थकतो
कोणी तरी साथ देईल म्हणून मधेच थबकतो ||

साथ तर मिळते.. पण फक्त दंभ ,इर्षा ,असूया ,रूपाने गाठते
नको यातील काहीच या विचाराने मन पुन्हा हात मारायला भाग पाडते    ||
पुन्हा प्रवाहात येताच खाचंखळग्यात   जाऊन शरीर आपटते
नको रे नको  देवा ...असे जीवन.. म्हणून परमेश्वरा कडे भिक मागते ......||

पण त्यातही कोणी एक जण असा काही   जगतो
देवासही त्याचे कडे पाहताच विचार  करायला लावतो  .         .||
नाही तर आपणा सारखे काही असतातच     .......जो
काठी होऊन  ऊगमा पाशी पडतो ..
मात्र  नुसता ओंडका होऊनच  दर्यास जाऊन बिलगतो ..............||

स्वच्छंद ,,,,
प्रतिक भिडे