Author Topic: काँग्रेसने म्हणतात…  (Read 536 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
काँग्रेसने म्हणतात…
« on: October 09, 2012, 10:04:13 PM »

काँग्रेसने म्हणतात… 

काँग्रेसने म्हणतात   रामराज्य आणले
रामराज्य ते परंतु   जनतेलाच नडले ।
कित्येक वर्षात    प्रगतीची उलटी चाल
ह्यांच्या गप्पांना नाही  राहिला काही ताळ ।
गरिबी हटावचे   एक घोषवाक्य केले
प्रत्यक्षात मात्र  त्यांनी गरीबच हटवले ।
सत्तेसाठी ते सारे  हपापले आहेत
त्यासाठीच अनेक   लबाड्या करत आहेत ।
भारतातून सारे   संस्थानिक गेले
अन त्यांच्या जागी  हेच राजे बनले ।
महाराणी ह्यांची  डिक्टेटर झाली
मंत्री मात्र सारे  बाहुली बनली ।
ह्यांच्या विरुद्ध काही  बोलायची सोय नाही
बोलेल त्याला  जीवाची खात्री नाही ।
धर्मा विरुद्ध धर्म  जाती विरुद्ध जात
ह्यांचा लढा  लावून  बसले गम्मत पहात ।
फोडा आणि झोडा   हेच त्यांचे तंत्र आहे
त्याच्याच जोरावर  राज्य चालविले आहे ।
राज्य चालवण्याचे   ह्यांचे तंत्रच वेगळे
हाथ घालती तेथे   झालेच सारे वाटोळे ।
परी ह्यांच्या राज्यात   सुकाळ दुष्काळाचा ।
काँग्रेसला मत देऊन   आता पश्चात्ताप झाला
परी सहन करण्या वाचून  मार्ग न काही उरला ।।
               रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_9.html

                   
« Last Edit: October 09, 2012, 10:05:35 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता