Author Topic: सर्वात्मक सर्वेश  (Read 376 times)

Offline kumudini

  • Jr. Member
  • **
  • Posts: 118
सर्वात्मक सर्वेश
« on: October 10, 2012, 04:21:14 PM »
सर्वात्मक सर्वेश
कुमुदिनी

तुज गणेश म्हणू की गुणेश
तू तर सर्वात्मक सर्वेश ||

रिशी मुनी तव स्तोत्रे रचिती
वेद रुचा हि वर्णिती
वर्णनातीत, शब्दातीत तू
तरीही उरसी शेष ||

पाई नुपूर करिती नर्तन
सूर तालांचे ते आवर्तन
सकल कलांचा तू अधिनायक
तूच खरा प्रथमेश ||

पाई तुझिया टेकिन माथा
आनंदाच्या उठती तरंगा
गुणातीत तू , भावातीत तू
विश्वात्मक विस्वेश ||

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: सर्वात्मक सर्वेश
« Reply #1 on: October 11, 2012, 10:58:55 AM »
ganapati bappa  morya