Author Topic: सखा विश्वाचा  (Read 390 times)

Offline kumudini

  • Jr. Member
  • **
  • Posts: 118
सखा विश्वाचा
« on: October 10, 2012, 04:39:20 PM »
सखा विश्वाचा

कुमुदिनी

नाही आता चांदरात

सूर्य तेज झाकोळत

सजल जलद अंबरात

मुक्त पणे संचार करिते ||

नाजुक सर वर्शियाली

फुलली जाई हसे चमेली

तारू वर वेली सचैल न्हाली

गंध मातीचा वारा घुमवीत ||

अमृत धारा जेवी बरसती

पिवळी राने हिरवळती

धुंद होऊनी मोर नाचती

गर्द पाचूच्या वनात ||

आभाळाने दान द्यायचे

अवनी ने ते भरून घ्यायचे

पाना पानातुनी गायचे

मल्हाराचे गीत ||

सखा असा हा विश्वाचा

समृद्धीला घेऊन आला

रिक्त होऊनी त्रीप्त मनानी

जाई आनंदात ||


Marathi Kavita : मराठी कविता

सखा विश्वाचा
« on: October 10, 2012, 04:39:20 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):