Author Topic: नियतीच्या मनातलं  (Read 623 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
नियतीच्या मनातलं
« on: October 13, 2012, 07:12:13 PM »
..नियतीच्या मनातलं ...

नियतीच्या मनातलं
कधी ओळखता येत कां
काय घडेल जीवनात 
सांगता  येत कां
सारीपाटचा खेळ मांडून
ती खेळत असते
कधी काय होईल
कुणास ठाऊक नसते
कधी घडत मनासारखं
कधी घडत नसतं
पण काय घडणारं हे
नियतीलाच ठाऊक असतं   
सारे धागेदोरे 
तिच्या हातात असतात
आपण पतंगासारखे
नभात उडत असतात
म्हणून गणित चुकतं
आयुष्यातलं
कुणाला ठाऊक असत
नियतीच्या मनातलं.

                                         संजय एम निकुंभ , वसई 

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: नियतीच्या मनातलं
« Reply #1 on: October 17, 2012, 12:56:56 PM »
hammmmm!
(kedar style)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: नियतीच्या मनातलं
« Reply #2 on: October 17, 2012, 05:22:08 PM »
chan kavita sanjay......