Author Topic: मैत्री अन प्रेमाचे प्रश्न?  (Read 922 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 476
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
आज परेंत मैत्री अन प्रेम यांची व्याख्या समजून घेत होतो,
मैत्री अन प्रेम यांच्यातला फरक खूप मोठा,
पण  यांच्यातला साम्य ओळखणं खूप अवघड...
याच  प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतोय....

मैत्री हि सगळ्यांशी केली जाते,
प्रेम फक्त एकावरच,
मग प्रेम सगळ्यांवर का नाही?

मैत्रीत असते मैत्रीची उब,
प्रेमात असते प्रेमाची उब,
मग मैत्रीत ती प्रेमाची उब का नही?

मैत्रीत अधिकार सगळ्यांना दिले जातात,
प्रेमात फक्त एकाच व्यक्ती साठी असतात,
मग प्रेमात ते मैत्रीतले अधिकार का नाही?

मैत्रीत फक्त हात मिळवणी असते,
प्रेमात प्रेमाने मारलेली मिठी असते,
मग मैत्रीत ती प्रेमाची मिठी का नाही?

मैत्रीत सगळ्यांसाठीची  काळजी असते,
प्रेमात फक्त एकाशीच  असते,
मग प्रेमात ती काळजी सगळ्यांसाठी का नाही?

मैत्रीत मुद्दामून रागवण असता,
प्रेमात हक्काने रुसणं असता,
मग मैत्रीत ते प्रेमाचे हक्क का नाही?

मैत्रीत मैत्रीसाठी मारलेली थाप असते,
प्रेमातली थाप सहसा व्यर्थ जाते,
मग प्रेमात ती थाप का नाही?

मैत्रीत मन जुळवावी लागतात,
प्रेमात ती अलगद जुळतात,
मग मैत्रीत ते मन का नही?

मैत्रीत सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी असतात,
प्रेमात फक्त दोघ्यान्च्याच गप्पा असतात,
मग प्रेमात सगळ्यांच्या  गोष्टी का नाही?

मैत्रीत सगळ्यांसोबत फिरणं असता,
प्रेमात फक्त एकांत असतो,
मग मैत्रीत तो एकांत का नाही?

अन मैत्रीत प्रेमाची कमतरता भासते,
प्रेमात मैत्री मिळून जाते,
मग मैत्रीत ते प्रेम का नाही....

अन ह्या गोष्टींची उत्तर मिळाली तर,
मैत्री अन प्रेम  कधी एकत्र होतील का?
मैत्री अन प्रेम  कधी एकत्र होतील का?

[कवितेतील सगळ्याच गोष्टी जसाच्या तश्या गृहीत न धरता यावर उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे...
विरोधात असतील तरी चालतील.. ;D :)]
                                                      ----श्रीकांत देशमाने
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
मैत्रीत फक्त मित्र प्रेम असतं
प्रेमात नात्या प्रमाणे  वेगळं असतं   
 
आई वडिलांच  प्रेम, भावंडांच प्रेम
आजी आजोबांचं प्रेम, शिक्षकांचं प्रेम
 
मित्राच प्रेम  वेगळ असतं
प्रियेच   प्रेम वेगळ असतं
 
मित्रांनी सगळ्याना मिठया मारल्या
तरी चालणार असतं
 
प्रिये नि असं केलं तर
ते कुठे चालणार असतं?   
 
 ;) :) :D
« Last Edit: October 16, 2012, 02:33:02 PM by केदार मेहेंदळे »

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 476
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
ha..ha..ha..
te pan khara aahe mhana...
kharach khup chan uttar milala...
thnk u kedarji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
मैत्री अन प्रेम सुक्ष्म गोष्टी आहेत
तुलनेत त्याच्या गोंधळ करू नकोस
मैत्री तून प्रेम उमलू शकते
प्रेमात मैत्री अनस्युत असते
बाकी कशात कसे वागावे
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):