Author Topic: नवरात्र  (Read 500 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
नवरात्र
« on: October 16, 2012, 09:23:56 PM »

घटी बैसे आदिमाया
नंदादीप नऊ दिस
नवान्नाने तृप्त झाला
झळाळतो अश्विन मास
दाट काजळी अंधार
कृष्णमेघ आले आले
भिजे हस्ताचे नक्षत्र
घट माळ ओले ओले
वृक्ष तरू लता वेली
तृप्त काळोख हिरवा
गारव्याने शहारतो
पानी कंटक बरवा
निवडंगांचे उंच फ़डे
एकाकी सुन्न रान
वेळूतून लहरते
शिळभारी मंद गान!
वेळूच्या बनी बाई
सखा कान्हुला राहतो
आकाशी तेज वीज
तेथे राधेला पाहतो
नवराती रातभर
राधा नाचली नाचली
तिच्या अंगोअंगी भिने
घननीळ्याची मुरली!"

Author Unknown
« Last Edit: October 16, 2012, 09:24:11 PM by madhura »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: नवरात्र
« Reply #1 on: October 17, 2012, 12:25:04 PM »
sundar kavita.kunachi shodhli ka?