Author Topic: देवबाप्पा...  (Read 507 times)

देवबाप्पा...
« on: October 19, 2012, 02:47:53 PM »
आई बघ ना ग.... आपला देवबाप्पा कसा दिसतोय..
माझ्याकडे बघून.. गालातल्या गालात हसतोय...
कुणी म्हणे गणेश अन गणपती.. तर कुणी म्हणतय मोरया..
माझ्यासारखंच त्याचंही.. बाबा म्हणतात पोप्या. तर तू म्हणतेस टिंग्या...

बाप्पाचे कान एवढे मोठ्ठे ग कशाला...??
आपण काय काय सांगतो... ते सगळ सगळ ऐकायला...??
बाप्पाची सोंड पण कित्ती कित्ती cute आहे...
तू दिलेल्या मोदाकापेक्षा माझा बाप्पाच जास्त स्वीट आहे.... :)

तुला माहितीये..? बाप्पाचे पोट एवढे मोठ्ठे कसे झाले..?
आजी म्हणते.. आपले काय काय चुकले. ते सगळे त्याने पोटात घेतले...
चल पटकन.. कान पकडून त्याला सॉरी म्हणूया...
दुधाची वाटी त्याने संपवली कि नाही बघूया....

एवढ्याश्या उंदीर मामावर बाप्पा कसा काय ग बसतो?
बाप्पाला घेऊन सुद्धा तो कित्ती फास्ट पळतो....
सांगितलंय बाप्पाला... माझी नवी सायकल तू घे...
उंदीर मामाला आता थोडा आराम करू दे...

तुझ्यासारखच बाप्पाची आई त्याला सारख सारख जवळ घेते का..?
अभ्यास केला नाही म्हणून त्याचे पण बाबा रागावतात का??
कोपऱ्यात रुसून बसला की त्याची आजी पण जवळ घेत असेल...
आजोबांनी आणलेला खाऊ एकटा एकटाच संपवत असेल... :)

माझा बाप्पा किनई माझ सगळ सगळ ऐकतो...
बाबांसाठी आणि तुझ्यासाठी मी रोज एक  एक सुट्टी मागतो...
आजोबांच्या खोकल्याच आणि आजीच्या गुडघ्यावरच औषध पण मी मागितलंय..
माझ्या खाउताला अर्धा खाऊ त्याला देतो म्हणून सांगितलंय...

रोज रात्री बाप्पा माझ्या स्वप्नात सुद्धा येतो..
दूर दूर डोंगरावर आम्ही रोज फिरायला जातो...
रात्रभर आम्ही दोघे खूप खूप मज्जा करतो...
सकाळ झाली की पुन्हा बाप्पा... गुपचूप देव घरात जाऊन बसतो...
आमच हे गुपित आई.. कुणा कुणाला नको ह सांगू....
आज रात्री भूर फिरायला जाताना... आम्ही तुला पण बरोबर नेऊ.... :)

टिंग्याची आई... Shailja..

Marathi Kavita : मराठी कविता

देवबाप्पा...
« on: October 19, 2012, 02:47:53 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline PRASAD NADKARNI

  • Jr. Member
  • **
  • Posts: 378
  • Gender: Male
  • Life:-a combination of adjustments & compromises
Re: देवबाप्पा...
« Reply #1 on: October 19, 2012, 03:47:19 PM »
 :)
nice 1

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: देवबाप्पा...
« Reply #2 on: October 19, 2012, 04:13:14 PM »
khup mast kavitaa aahe.....
 pan mala vatat hi baal kavitet asaayalaa havi ka?

Re: देवबाप्पा...
« Reply #3 on: October 19, 2012, 04:15:33 PM »
:)
Abhari ahe Prasad and Kedar...
Tingyache aaine lihili ahe na manun ithe takali... :)
if u suggest so then we can move it to Baal kavita... :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):