Author Topic: वार्धक्यांतील एकांतात...  (Read 408 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
वार्धक्यांतील एकांतात...

वार्धक्यांतील एकांतात  स्मृतिंना उजाळा येतो

तारूण्यांतील इतिहास  प्रथम डोळ्यांसमोर येतो । 

शूरत्वाचे क्षण काहीं   पटापट जोडले जातात

कुणालातरी मोठ्याने  सारखे सांगावेसे वाटतात ।

गंमतीदार प्रसंग काहीं   उगींच मनां हंसवितात

चॉकलेटच्या गोळी परि  ते सारखे चघळले जातात।

धूंद अशा त्या प्रीतिचे  क्षण जेव्हां मनीं येतात

वार्धक्यांतही अंगावर   रोमांच पुन्हां उभे रहातात ।

शिथिल झाल्या गाञांना  जेव्हा त्याची आठवण येते

स्वैर अश्या धुंदीत   पुन्हां जगावेसे वाटते।

स्मृतिंच्या सान्निध्यात  मन जरी तरुण होते

शिथिल शरीर माञ  त्यासंगे न धांवू शकते ।

पुष्कळ दुःख जीवनात जरी  अनुभवास आले असले

तरी सुखाच्या क्षणांचीच   मनीं फक्त आठवण होते।

वार्धक्यांत स्मृतिंना त्या   आगळाच रंग येतो

एक एक आठवणींचा हार   मनीं गुंफला जातो ।।                     

रविंद्र बेन्द्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_19.html


 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वार्धक्यांतील एकांतात...
« Reply #1 on: October 20, 2012, 09:16:45 AM »
kavita avadali... khup chan!

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
Re: वार्धक्यांतील एकांतात...
« Reply #2 on: October 20, 2012, 09:34:37 AM »
thanks

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: वार्धक्यांतील एकांतात...
« Reply #3 on: October 20, 2012, 11:14:54 AM »
Apratim...