Author Topic: अकाली संपवलेली सायंकाळ  (Read 495 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
अकाली संपवलेली सायंकाळ

जीवाच्या आकांताने
तो ओरडत होता
माझा काय गुन्हा
हा एकचं प्रश्न करतं होता
डोळ्यातलं पाणी तर
कधीच गोठून गेलं होतं
तरी साऱ्यांच मन
तो चिरत होतं
साऱ्या उन्हांना सोसल्यावर
आता कुठे सावलीत आलो होतो
सायंकाळ जाईल निवांत
म्हणून शांत मनानं विसावलो होतो
दोनच पाखर माझी
शिकून मोठी केली होती
ती हि परदेशात
दूर उडून गेली होती
कसं बसं समजावत होतो
मी माझ्या मनाला
दुःखाचीच किनार होती
माझ्या त्या जगण्याला
खूप नाही तरी
थोड मी कमवलं होतं 
ज्याने माझं जीवन
सुरळीत चालू होतं
माझी जोडीदारीण
होती माझ्या सोबतीला
नवीन सुरवात केली होती
अमुच्या सहजीवनाला
मी बाथरूम मध्ये असतांना
दाराची बेल वाजली होती
तेव्हा माझी सहचारिणी
स्वयंपाक घरात होती
तोच तिची आर्त किंकाळी
माझ्या कानावर आली
मी बाहेर येतां
ती रक्ताच्या थारोळ्यात दिसली
क्षणार्धात दोन जणांनी
माझ्या मुसक्या बांधल्या
गर्भगळीत शरीराचा
गळा त्यांनी आवळला
होत्याचे नव्हते झाले
देह दोघांचे निष्प्राण झाले
सांग तूच देवा
अमूचे काय चुकले 
आता कोण करेल न्यायनिवाडा
त्यास काही अर्थ नसतांना
आम्ही का भोगली शिक्षा
काहीच गुन्हा नसतांना .

                                  संजय एम निकुंभ , वसई
                                  दि. १९.१०.१२ स. ७.१५