Author Topic: प्रेम.. आणि आजची पिढी  (Read 695 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
प्रेम.. आणि आजची पिढी
« on: October 21, 2012, 12:11:50 AM »
मागून मागून मागतोय काय तर
फक्त एक संगत
एक हवीहवीशी संगत
आणि काही घेण्यापेक्षासुद्धा
बरंच काही देण्यासाठीची
एक प्रेमळ संगत..
आतून जाणवतंय
काहीतरी दबून राहिलेलं
भरभरून वाहिलेलं
डुंबून जाईल एवढं प्रचंड असं काही
कुणीतरी डुंबावं यासाठीचंच
पण दिवस असे हे फुकाचे
दोन वेगळ्या मनांचे
एक देण्यासाठी आतुरलेला
तर दुसरा झुरवण्यासाठी
आसुरी आनंद घेण्यासाठी
जीवाची तडफड पाहण्यासाठी..
असा एकच विचार दोघात फसलेला
आणि कुणीच सुखी नसलेला
बिघडलेली तारुण्याची घडी
अशी हि आजची पिढी
अशी हि आजची पिढी..

- रोहित

Marathi Kavita : मराठी कविता