Author Topic: ईश्वराने निर्मिली सृष्टी...  (Read 509 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
ईश्वराने निर्मिली सृष्टी...

ईश्वराने निर्मिली सृष्टी
नंतर पुरुष तो निर्मिला
कमतरता त्यांत वाटली म्हणून
प्राण आणखी घातला ।
हलता बोलता पुरुष पाहून
गर्वाने देव फुलून गेला
त्याही पेक्षां सुंदर वस्तु
बनविण्याचा ध्यास घेतला ।
कर करून विचार त्याने
सुंदर नारी बनविली
त्यामुळेंच पुरुषाची न त्याची
शांति पूर्ण ढळून गेली ।।      रविंद्र बेन्द्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this

http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_20.html