Author Topic: वेदनांचा महोत्सव  (Read 427 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
वेदनांचा महोत्सव
« on: October 24, 2012, 07:59:01 AM »
वेदनांचा महोत्सव 

सुखाचा महोत्सव
सारे करतांना दिसतात
पण वेदनांचा महोत्सव
कुणी करत नाही
म्हणूच मी ठरवलं
वेदनांचाच महोत्सव करायचा 
कारण त्यांच्या इतकं सुखही
आपल्या जवळ रहात नाही
मग वेदनांनाच मी
जीव लावत गेलो
त्यांच्यावर मनापासून
प्रेम करतं गेलो
न काय आश्चर्य
वेदनाच माझ्यासाठी फुलं होत गेल्या
सुखाचे पाट होऊन
नसानसात वाहू लागल्या
आता वेदनांचा अर्थच
मी बदलवून टाकलाय
माझ्या आनंदी जगण्याच गुपित
जगास सांगून टाकलंय .

                                         संजय एम निकुंभ , वसई
                                      दि.२४.१०.१२ वेळ : ७.३० स.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mandar Bapat

  • Jr. Member
  • **
  • Posts: 263
  • Gender: Male
Re: वेदनांचा महोत्सव
« Reply #1 on: October 24, 2012, 11:10:16 AM »
apratim..khup chan