Author Topic: ।। शब्दम् शरणम् गच्छामि ।।  (Read 541 times)

।। शब्दम् शरणम् गच्छामि ।।

न कळती मज मात्रा , वृत्त् , न्यास-समास
ठाऊक नसति यमक, प्रास-अनुप्रास
तरी ही मनाचा असे हा अट्टाहास
एक कविता लिहावी सुंदर-झकास ।।

जागून रात्री-बेरात्री किती केल्या शब्दांच्या कसरती
सर्कशीतल्या विदुषकापरी वाकुल्या ते मज दाविती
घेऊनि गिरक्या गोल-गोल डोक्यास माझ्या शिणविती
मारुन कोलांट-उड्या दूर दूर ते पळती ।।

शब्दांची फुलपाखरे जवळ माझ्या न फिरकती
संपते शाई झरणीतली अन् हातही माझे दुखती
थकुनि गात्रे सारी ते नेत्रही निद्राधीन होती
स्वप्नातही न सोडती मज भूतापरी समोर ठाकती ।।

बा शब्दांनो । विनविते अगतिक मी तुम्हास
तुम्हावाचुन व्यर्थ न होवो माझा प्रयास
वाक् देवतेची  आण तुम्हा घालते शेवटास
मोरपिसापरी अलगद यावे पुर्ण करावे कवनास ।।

               - श्रीमति प्रतिभा गुजराथी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ।। शब्दम् शरणम् गच्छामि ।।
« Reply #1 on: November 05, 2012, 12:58:01 PM »
chan kavita.....

Offline shanu

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Female
  • Me 1 kavi
Re: ।। शब्दम् शरणम् गच्छामि ।।
« Reply #2 on: November 05, 2012, 02:14:50 PM »
फारच सुंदर कविता!!!  :)