Author Topic: ।। माझी सखी माझी कविता ।।  (Read 576 times)

।। माझी सखी माझी कविता ।।

ढगांच्या अवगुंठनातून
हळूच डोकावणाऱ्या
   चंद्रकोरी सारखी
   येतेस तू सखे

तुझ्या शीतल आगमनाने
पाझरायला लागतो
   माझ्या मनातला
   चंद्रकांत-मणि

आणि माझ्या रोमारोमातून
   अचानक स्त्रवू लागतात
   शब्दांच्या अमृत-कणि

माझ्या मानस पटलावर
हळूवार कुंचल्याने चितारलेल्या
   चित्रासारखी अवतरतेस तू
   होऊन अवखळ सुंदर मनकरणि ।

               - श्रीमति प्रतिभा गुजराथी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ।। माझी सखी माझी कविता ।।
« Reply #1 on: November 05, 2012, 12:58:45 PM »
chan....

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
Re: ।। माझी सखी माझी कविता ।।
« Reply #2 on: December 14, 2012, 10:51:57 AM »
सुरेखच