Author Topic: मद्यराष्ट्र  (Read 533 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
मद्यराष्ट्र
« on: November 07, 2012, 06:37:42 AM »
मद्यराष्ट्र

 खंर तर किती अभिमानाची गोष्ट
 महाराष्ट्र मद्यराष्ट्र होतंय
 बारामतीच नाव त्यामुळे
 किती मोट्ट होतंय
 पण डॉक्टर अभय बंग
 काहीतरीच बोलताय
 उगीच नको ते
 पवारांवर आरोप करताय
 म्हणे युवकांना दारूची सवय लावताय
 दारू निर्मिती करून वाट लावताय
 पण सरकारला किती महसूल मिळतो
 हे त्यांना कसं कळत नाही
 उगीच प्रत्येक राजकारणी
 दारूचा धंदा करत नाही
 लोकांची ते किती सोय करतात
 महसूल मिळवून देशसेवा करतात
 किती लोकांना रोजगार देतात
 लोकांची मुलभूत गरज ते भागवतात
 कोणी कितीही बोम्बल तरी
 त्यांना काही फरक पडणार नाही
 त्यातच पैसा न जनसेवा आहे
 हे कुणाला कळत नाही .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि . ५.११.१२

Marathi Kavita : मराठी कविता