Author Topic: ~काहीच नाही ~  (Read 751 times)

Offline vaibhav_kul2003

  • Newbie
  • *
  • Posts: 7
~काहीच नाही ~
« on: November 17, 2013, 08:29:11 PM »
पाउसाला मला काही सांगायचे होते
पण ढग बसले फुगून म्हणे फुटायचे नाही

सई ची ती छबी मला टिपायची होती
पण सई म्हणे आज मला....मला रुसायचे नाही

गवताला आज मला सजवायचे होते
पण दव म्हणे त्याच्यावरती बसायचे नाही

हळव्या त्या उत्तरांना कुरवळाचे होते
पण उत्तर म्हणे आज तुला डसायचे नाही

वहीवरती काही मला लिहायचे होते
पण शब्द म्हणे आज मला सुचायचे नाही

 
वैभव कुलकर्णी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: ~काहीच नाही ~
« Reply #1 on: November 18, 2013, 12:06:06 PM »
प्रेमात पडल्यावर मित्रा
असं सार होत असत,
बरच काही करायचं
पण सुचत मत्र काही नसत...!!!

छान.