Author Topic: मुली कशा पटवाव्या !!!  (Read 16431 times)

Offline Yogesh Dalvi

 • Newbie
 • *
 • Posts: 15
मुली कशा पटवाव्या !!!
« on: August 09, 2011, 03:37:52 PM »
.. .. मुली कशा पटवाव्या…
मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात
प्रेमात पडण्याच्याबाबतीत.
तशीही प्रत्येकाच ीच इच्छा असते
एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास
९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु
जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’
कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न
ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं
आणि मग हात चोळत बसावं लागतं.
प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात
मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं
म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ
असते. पण होतं काय,
की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला)
लहान पणी शेंबुड
पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं
असतं, मोठा झाल्यावर त्याची /
किंवा तिची ती नाक
पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही,
त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट
दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के
लोकांच्या बाबतीत खरी असते, अगदी एक
टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं
रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं
खरे शहाणे असतात.
आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार
जुन्या काळच्या आहेत.. तरी पण
आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.
१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं
तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं,
आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर
खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात
तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे
तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.
२)ट्रेनमधेभरपूर मराठी वाचनीय साहित्य
घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली,
तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक
जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल,
आणि मग ओळख …. वगैरे….
३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे
काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे
याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु
व्हायची वेळ झाली की बाहेर
कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा,
आणि सारखं घड्य़ाळाकडेबघत रहा. हाउस फुल्ल
चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी ,
ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून
त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा..
आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण
आला नाही म्हणून….
आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर
याचं कारण म्हणजे मुली एकट्या कधीच
सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड
तरी असतो, किंवा एखादी मैत्रीण
तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर
आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात
ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच
तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून
चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.
४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच
वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन
तिला लिफ्ट ऑफर करा..
५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत
असतांना एकदम जोरात पाउस येतो,
आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार
होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच
आडोसा नाही, तेंव्हा प्रवास
करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला काय
सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..
६) एखादी आपल्या घराच्या आसपास
रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा.
तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन
ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने
प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात
की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता.
तिच्या येण्याच्यावेळाचे पण पालन करा.
म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.
७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस
लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक,
साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात
जाणं सुरु करा. चेहेऱ्यावरशक्य तेवढे बावळट
भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत
अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस
तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास
बसला की तुम्ही इतरांसारखेनाही,
तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे
वा…. तुम्ही पण
येता का सिध्दी विनायकाला?? जागृत
देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या
कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच
हातात आहे सगळं….
८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स
कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर
फिरायला खूप आवडतं.
९) टिपीकल मराठमोळ्या
मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच
दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु
शकते.
१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल
तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून
देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी.
हल्ली चेहेरा ओढणीने झाकून प्रवास
करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल
याची भिती नसते.

Author Unknown
« Last Edit: August 09, 2011, 03:58:39 PM by talktoanil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sushil_d

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #1 on: August 09, 2011, 05:39:13 PM »
  ;) अप्रतिम :)

Offline ankush.sonavane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #2 on: August 10, 2011, 11:23:23 AM »
nice tips yaar

Offline Nishu1401

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male
 • Some's Boring Me, I Think It's Me :(
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #3 on: August 10, 2011, 11:34:59 AM »
Bhari.....  :D  ;D  8)  :-*

Offline tok2sameer

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #4 on: August 21, 2011, 03:38:45 PM »
nakkich lakshat theven :)

Offline ethanjkiss

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #5 on: August 22, 2011, 08:43:24 AM »

ley bhari

Offline rockinjoe46

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #6 on: August 29, 2011, 02:30:05 PM »
Ekdam mast .....btw Tikitanchi idea zakass ahe  ;)

Offline machosagar007

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #7 on: September 02, 2011, 08:31:06 PM »
 :) :) :) :) :)

Offline devshishshinde

 • Newbie
 • *
 • Posts: 10
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #8 on: September 25, 2011, 07:21:57 PM »
Chan Tips ....  :) :) :) :) :)

Offline mrralekar

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Re: मुली कशा पटवाव्या !!!
« Reply #9 on: September 25, 2011, 08:03:40 PM »
haahaaha

Chan ahe kavita ........ mala avadali ........ :D


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):