Author Topic: फेसबुकवरील एक खरी प्रेमकथा, जी पुर्ण होता होता अधुरी राहीली...!!  (Read 1785 times)

फेसबुकवरील एक खरी प्रेमकथा,
जी पुर्ण
होता होता अधुरी राहीली...!!

दोन दिवसा पुर्वी अँड
झालेल्या मैत्रिणीँने
काल सहज मला विचारलं की,
" सुरेश तु एवढ्या छान
कविता लिहतोस,
त्या वाचल्या की मन भरुन
येतं,
तरीही म्हणतोस की,
तु कुणावर प्रेम करत नाही...
हे कसं शक्य आहे रे ???

मी मनातले दुःख लपवून,
तिला हसत हसत उत्तर दिले,
" मी कुणावर प्रेम करतो,
हे मी तुला कधीच सांगु शकणार
नाही,
किँवा तुझ्याशी माझ्या भावना शेअर
करणेही मला जमणार नाही...
फक्त तुला एकच सांगु शकतो की,
तिचा विचार मनात
असल्याशिवाय,
मी कविता काय एक शब्दही लिहू
शकत नाही...
किँवा तिच्याशिवाय
माझी कविता पुर्णही होऊ शकत
नाही.....

तर मग ती सांग ना सांग
ना म्हणुन मागेच लागली,
सुरेश प्लीज सांग
ना तुझी लवस्टोरी,
फक्त एकदा माझ्यासाठी.....

मी थोडा थांबलो आणि कसला तरी व
करु लागलो,
आणि तिला म्हटलो,
" मला फेसबुकवरच
भेटली होती ती,
मला जशी हवी होती अगदी तशी,
पण
तरीही मी तुला माझी लवस्टोरी सांगणार
नाही,
जी लिहली गेली होतीच अधुरी,
अशी प्रेमकथा सांगुन
मी तुला रडवणार नाही...
हो पण जमत असेल तर
माझ्यासाठी प्रार्थना कर.....

" जे काही माझ्या सोबत घडलं,
ते दुस-यांन सोबत कधीच
घडायला नको...
आणि चुकून
सुध्दा कुणी फेसबुकवर,
कुणाच्या प्रेमात
पडायला नको...
विरहाच्या अग्नीत
कोणी जळायला नको,
माझ्यासारखं
पुन्हा कोणी कुणाच्या आठवणीत
रडायला नको.....

बस एवढे बोलून मी माझ्या,
अनावर झालेल्या भावनांना,
कसाबसा सावरत तिला,
बाय बोललो......... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २५-०९-२०१३...
सांयकाळी ०६,०८...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: September 25, 2013, 07:03:42 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
सोशिअल साईट हे एक फसवे जग आहे मग तिथे केलेलं प्रेम तरी खरे कसे असेल ?

सोशिअल साईट वर मी एक लव-स्टोरी लिहिली आहे, खाली लिंक दिली आहे …. वेळ भेटला तर नक्की वाच आणि स्वत:ची अवस्था अशी कधीही होवू देवू नकोस…. प्रेमभंगाच दुख खूप भयंकर असतं पण ते आपल्याला बरंच काही शिकवून हि जातं …
 
तिचे मनोविश्व
http://marathikavita.co.in/index.php/topic,3672.msg10189.html#msg10189जमलं तर अजून एक स्टोरी वाच…. माझी नाही पण मला खूप आवडते आणि माझ्या मते तू तर ती नक्कीच वाचलीस पाहिजे प्रेमभंगाच्या दुखातून बाहेर पडण्यासाठी …

चांदणं - नातं म्हणजे काय?
http://marathikavita.co.in/index.php/topic,1654.0.html