Author Topic: मी तुझ्याशिवाय नाही जगु शकत...!!  (Read 2151 times)

माझा ब्रेकअप झाल्यानंतर
१४ फेब्रुवारी २०१२ ला
मी माझ्या प्रियासीला व्हेंलनटाईन
डे Wish
करण्यासाठी
फेसबुकवर केलेला शेवटचा मेसेज.....

मलाचं माहित नाही मी रोज,
कसा जगण्याचा प्रयत्न करतोय,
तुला न आठवावे म्हणुन
स्वःताला नेहमी बिझी ठेवण्या प्रयत्न
करतोय.....

काय माहीत ?
माझ्या सोबत का असे झाले,
ज्यांना आपले म्हटले,
तेचं आज मलाचं परखे झाले.....

किती प्रेम करतो मी तुझ्यावर,
हे तुला कधीचं कळणार नाही,
माझे खरे प्रेम आहे तुझ्यावर,
टाईमपास किँवा पोरखेळ नाही.....

तु सुध्दा माझ्याशी,
परख्यासारखी वागलीस,
एका चुकीच्या निर्णयाने,
माझा त्याग करुन निघून गेलीस.....

रोज रात्री झोपण्यापुर्वी आणि सकाळी,
देवा मला दुसरा दिवस दाखवु नकोस,
अशी नेहमी प्रार्थना करतोय.....

रोजचं तुझ्या आठवणीत झुरतोय,
रोजचं तळमळतोय,
रोजचं धडपडतोय,
अडखळतोय तळमळतोय तडफडतोय.....

रोजचं रडत रडत
स्वतःला फसवण्याचा,
अर्थहीन निरुपयोगी प्रयत्न
करतोय,
रोजचं झिरपनारे अश्रूं पितोय.....

मी तुझ्यावर खुप खुप प्रेम
करतो गं,
जसे काल करत होतो,
तसे आजही करतोय,
" I LOVE YOU...
Shona.....
मी तुझ्याशिवाय नाही जगु शकत.....

यानंतर तिने मला,
" SAME TO YOU बोलून,
BLOCK केले..... :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-०२-२०१२...
रात्री ००,०९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


शोना

  • Guest
"तिने मला " SAME TO YOU बोलून BLOCK केले."


तिच्या त्या स्पष्ट संदेशानंतर अमर्याद विनवण्या आणि निर्भर्त्सनांचा दुहेरी मारा तिच्यावर करत रहाण्यार्‍या कित्येक कविता ह्या ब्लॉग्‌मधे प्रसिद्ध करत रहाण्याचे नेमके प्रयोजन काय आहे? त्या कवितांना काही वाङ्‍मयीन मौल्य आहे का?