Author Topic: मी तुझ्यावर खुप प्रेम करतो...!!  (Read 1713 times)

तिचं अन् माझं नेहमी
एका विषयावर भांडण होत असतं,
विषय काय तर
मी इतर मुलीँनशी फ्रँकली बोलतो.....

म्हणुन,
तिला माझा खुप राग येतो,
आणि रागारागात ती म्हणते,
" तु ना माझ्यावर,
प्रेमच करत नाही,
तुला ना माझी,
थोडीही काळजी नाही.....

तिचं असं बोलणं
माझ्या मनाला टोचून गेलं,
आणि मला राहवलं नाही
म्हणुन,
मी माझ्या नेहमीच्या शैलीत,
म्हणजेच माझ्या कवितेत उत्तर दिलं.....

<3 <3 प्रिय शोनू...!!

मी दुस-या मुलीन बद्दल,
किती जरी बोललो,
तरी त्यांना तुझी सर,
कधीच येणार नाही.....

त्यांचे कितीही गोडावे गायले,
कितीही कौतुक केलं,
तरी त्या माझ्या,
कधीच होणार नाही.....

त्यांच आणि माझं फक्त,
मैत्रीच नातं आहे प्रेमाच नाही.....

कारण ???

माझ्या मनात,
माझ्या ध्यानात,
माझ्या ह्रदयात,
माझ्या स्वप्नात.....

माझ्या बोलण्यात,
माझ्या अबोल्यात,
माझ्या हसण्यात,
माझ्या रडण्यात.....

माझ्या शब्दात,
माझ्या कवितात,
माझ्या विचारात,
माझ्या श्वासात.....

माझ्या आयुष्यात,
माझ्या जगात,
फक्त आणि फक्त तुच आहेस,
अजुन कोणच नाही.....

" i love u शोनू,
मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०६-१०-२०१३...
रात्री ०९,००...
© सुरेश सोनावणे.....